|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » भारतीय वायूसेनेच्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा

भारतीय वायूसेनेच्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आला. या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे वतीने आज 11च्या सुमारास पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय वायूसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकला दुजोरा दिला आहे. सामन्य माणसाला कुठल्याही त्रास न देता कारवाई केली असून ट्रेनिंग कॅम्पवरचा हल्ला केला या कारवाईत मोठय़ा प्रमाणात दहशतवादी ठार झाल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Related posts: