|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही : संजय राऊत

अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. ’

‘हाऊ इज द जैश… डेड सर’ असा आनंद नेटिझन्सकडून व्यक्त होतोय. या कामगिरीबद्दल वायुसेनेचे अभिनंदन करतानाच, जैशच्या सैतानाला – अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथे ’जैश-ए-मोहम्मद’नं सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-2 करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ही इच्छा आज वायुसेनेने पूर्ण केली आहे. ‘मिराज 2000’ या हायटेक लढाऊ विमानांमधून भारताने 1000 किलोचे बॉम्ब ’जैश’च्या तळांवर पाडले. त्यात 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे समजते.

 

Related posts: