|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » मै देश नही मिटने दूंगा : नरेंद्र मोदी

मै देश नही मिटने दूंगा : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / चुरू(राजस्थान) :

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील चुरू येथे पहिल्यांदाच बोलत आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना देश सुरक्षित हातात असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी 2014 मध्ये उच्चारलेल्या त्या कवितेच्या ओळी पुन्हा एकदा म्हणून दाखवल्या. ते म्हणाले, सौगंद है मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दुंगा मै देश नही रुकने दुंगा मै देश नही झुकने दुंगा.

राजस्थानातील चुरू येथील एका सभेत बोलताना मोदी म्हणाले, मी देशवासियांना विश्वास देतो की, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. देशासाठी प्राणार्पण करणाऱया जवानांना माझे शतशः प्रणाम.मोदी म्हणाले, आम्ही शेतकऱयांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. मात्र, त्यात राजस्थानमधील एकाही शेतकऱयाचे नाव नाही. कारण इथल्या काँग्रेस सरकारने याची यादीच केंद्र सरकारकडे पाठवलेली नाही. पुढील दहा वर्षात साडेसात लाख करोड रुपये शेतकऱयांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱयांना काहीही करायची गरज नाही. त्यांना केवळ पैसे जमा झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर येईल.

 

 

Related posts: