|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » पालघरमध्ये आजवरचा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का

पालघरमध्ये आजवरचा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का 

ऑनलाईन टीम / पालघर :

पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी तालुक्यात पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. आजवरचा सर्वात मोठा धक्का आहे. यामुळे काही ठिकाणी भिंतींना तडे पडले असून अनेक ठिकणी भांडी ही खाली पडली. पालघर जिल्ह्यासह गुजरातमधील उंबरगाव, सिल्वासा, वापीही या भूकंपाने हादरले आहे.

  आजवरचा हा सर्वात मोठा धक्का 4.3 मॅग्नेटय़ूट आहे. मागील महिन्यात 4.1 चा धक्का बसला होता. आज बसलेल्या धक्क्याने काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. आज दहावीची परीक्षाही सुरू असून काही ठिकाणी विद्यार्थीही भयभीत असल्याची माहिती आहे. मध्यरात्रीपासून 5 ते 6 सौम्य धक्के जाणविले गेले असून ते मोजले गेले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.