|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Automobiles » रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ABS च्या विक्रीस सुरूवात

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ABS च्या विक्रीस सुरूवात 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

रॉयल एनफिल्डने गेल्या वर्षी आपल्या लाईनअपमध्ये ABS देण्यास सुरूवात केली होती. आता त्यापुढे जात रॉयल इनफिल्डने आपल्या क्लासिक 350 च्या स्टॅंडर्ड वर्जनमधील सेफ्टी फिचर समोर आणले आहे.  रॉयल इनफील्ड क्लासिक 350 ABS ची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 1.53 लाख आहे. यामध्ये चांगल्या ब्रेकसाठी ड्युअल चॅनल यूनिट देण्यात आले आहे. हे फिचर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये क्लासिक 350 सिंगल एडीशनमध्ये लॉंच करण्यात आले होते. यानंतर वेगवेगळ्या फेजमध्ये गनमेटल ग्रे आणि   Redditch मॉडेलमध्ये उपलब्ध केले गेले आहे. 

 नवी क्लासिक 350 एबीएसही नॉन एबीएस मॉडेलच्या तुलनेत 5 हजार 800 रुपयांनी महाग असेल. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 एबीएसमध्ये कोणतेही जादा फिचर्स देण्यात आले नाहीत.  या बाईकमध्ये जुने 346 सीसी, सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिनच उपलब्ध आहे. हे इंजिन 5250 Rpm वर 19.8 bhp इतकी पॉवर आणि 4000 rpm वर 28 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या मोटरसोबत 5 स्पीड गियरबॉक्स देखील मिळतो.