|Friday, May 24, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » 20 रूपयांचे नाणे चलनात येणार

20 रूपयांचे नाणे चलनात येणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

नोटाबंदीनंतर 10, 50, 100, 200, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारने 20 रुपयाचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने या संदर्भात एक अधिसूचना काढली आहे. हे नाणे सध्या मोठय़ा प्रमाणात चलनात आहेत. आता त्याला 20 रुपयाच्या नाण्याची जोड मिळणार आहे. नव्या नाण्याच्या बाहेरील बाजूस 65 टक्के तांबे, 15 टक्के झिंक, 20 टक्के निकेल असेल तर, आतील बाजूस 75 टक्के तांबे, 20 टक्के झिंक आणि 5 टक्के निकेल असेल.

 

हे नाणे 27 मिलिमीटर व्यासाचं व 8.54 ग्रॅम वजनाचे असेल. या नाण्याला 12 कडा असतील. नाण्याच्या एका बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले असेल. उजव्या बाजूस भारत व डाव्या बाजूस लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसऱया बाजूस नाण्याचं 20 रुपये हे मूल्य कोरलेलं असेल. त्यावर ₹ हे चिन्ह असेल. त्याशिवाय, धन्याच्या लोंब्या असतील. वीस रुपयांच्या नाण्यासोबतच सरकार 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नवी नाणीही आणणार आहे.

 

Related posts: