|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलचे खास डुडल नारी शक्तीला सलाम

गुगलचे खास डुडल नारी शक्तीला सलाम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असते. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असते.गुगलने 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचे मन जिंकले आहे.

गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला आहे.आज जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिनी वेगवेगळय़ा पतीने साजरा केला जात आहे.गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत. गुगलने बनवलेल्या खास डुडलवर क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळय़ा भाषांमधील कोट्स दिसू लागतात. तसेच कोट्स देणाऱया महिलांचे नाव सुद्धा या ठिकाणी वाचता येते.गुगलने या खास आणि महत्त्वपूर्ण डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे.