|Wednesday, March 20, 2019
You are here: Home » Top News » विखेंच्या भाजप प्रवेशाने आज काँग्रेसमध्ये भूकंप?

विखेंच्या भाजप प्रवेशाने आज काँग्रेसमध्ये भूकंप? 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

अहमदनगर लोकसभा उमेदवारीवरुन आज काँग्रेसमध्ये भूंकप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. सुजय विखे पाटील अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असून आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर, मुलापाठोपाठ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलदेखील विरोधी पक्ष नेतेपदाचा 

राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडणार आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा आहे. तर, डॉ. सुजय यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे काही दिवसांसाठी तरी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात अहमदनगर दक्षिणची जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार झाली नाही. त्यातच राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुजय यांनी निवडणूक लढवावी असाही प्रस्ताव समोर आला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही यावर खल सुरू होता. 

Related posts: