|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणारी नाही : विखे पाटील

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणारी नाही : विखे पाटील 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

दमुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही, असे सांगतानाच पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, मुलगा भाजपमध्ये गेल्याने विखे-पाटील यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफरच शिवसेनेने विखे यांना दिली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपनेही त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देणार असल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी भूमिका मी पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून सांगितली आहे. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून लगेच पदाचा राजीनामा देणार नाही. पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

Related posts: