|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात भाजपा नगरसेविकेची महिला डॉक्टरला मारहाण

पुण्यात भाजपा नगरसेविकेची महिला डॉक्टरला मारहाण 

ऑनलाईन टीम / पुणे  : 

 पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरला भाजपाच्या नगरसेविकेने मारहाण केली असून संबंधित नगरसेविकेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रात्री दोनच्या दरम्यान घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी  रात्री स्नेहल या वॉर्ड क्रमांक 43मध्ये रुग्णावर उपचार करत असताना कोंढरे यांनी तेथे येऊन  त्यांना तातडीने त्यांच्याशी संबंधीत रुग्णावर उपचार करण्यास सांगितले. त्यावर स्नेहल यांनी त्या रुग्णाच्या डोक्यात टाके घातले असून सी टी scan  साठी पाठवायचे आहे असे उत्तर दिले. यावर चिडलेल्या नगरसेविकेने तुझी तक्रार वरिष्ठांकडे करते सांगून मोबाईल camera द्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉ. स्नेहल यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी दिली. दरम्यान कोंढरे यांचा मुलगा पृथ्वीराज सचिन कोंढरे यांच्याकडून झालेल्या अपघातामध्ये संबंधित रुग्ण जखमी असल्याचे समजते. मात्र याबाबत कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. 

Related posts: