|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » विखेंच्या निष्ठेवर थोरातांचे प्रश्नचिन्ह; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

विखेंच्या निष्ठेवर थोरातांचे प्रश्नचिन्ह; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अडचणीत आलेले काँग्रेसचे ज्ये÷ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आक्रमक झाले आहेत. थोरात यांनी विखेंना नैतिकतेची आठवण करून देत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसशी नि÷ावान आहेत का हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे,’ असा टोला थोरातांनी लगावला.

 

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले राधाकृष्ण विखे-पाटील आपल्या घरातूनच पक्षाविरोधात झालेले बंड थोपवू शकले नाहीत. त्यांचे चिरंजीव सुजय यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राजीनामा न देण्याची भूमिका विखे-पाटील यांनी घेतली आहे. मात्र, पक्षातूनच त्यांच्या नि÷sबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. नगरच्या राजकारणात विखेंचे कडवे प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात हे विखेंना घेरण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांनी विखे-पाटलांवर जोरदार टीका केली आहे.

 

Related posts: