|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुचाकी घसरून दोघे तरुण जखमी

दुचाकी घसरून दोघे तरुण जखमी 

महामार्गावर हुमरस-आकेरी दरम्यानची घटना

वार्ताहर / कुडाळ:

मुंबई-गोवा महामार्गावर हुमरस-आकेरी दरम्यान मोटारसायकल रस्त्याच्या बाहेर गेल्याने घसरून झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला, तर त्याचा सहकारीही जखमी झाला. मोटारसायकलस्वार संदेश अशोक कुंभार (30, रा. पावशी-कुंभारवाडी) या गंभीर जखमीला अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. संदेश कुंभार आपल्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. त्याच्या मोटारसायकलमागे किरण तुकाराम गोसावी (35, रा. पावशी-गोसावीवाडी) बसला होता. हुमरस-आकेरी दरम्यानच्या रस्त्यावर संदेशचा मोटारसायकलवरील ताबा सुटला. ती रस्त्याच्या बाहेर गेली आणि घसरून अपघात झाला. यात संदेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर किरणही जखमी झाला. दोघांवर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. गौरव घुर्ये यांनी उपचार केले.

Related posts: