|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » इथे निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते मिळतील, उस्मानाबादेत मजूर सोसायट्यांची जाहिरात

इथे निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते मिळतील, उस्मानाबादेत मजूर सोसायट्यांची जाहिरात 

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :

 लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असताना उस्मानाबादमधील दोन मजूर सोसायट्यांनी प्रचारासाठी तसेच सभांसाठी कार्यकर्ते पुरवण्याची भन्नाट आयडीया काढली आहे. फेसबुकवर देखील ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे.

 निवडणूक काळात राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला कार्यकर्ते कुठून आणणार असा अनेकदा प्रश्न पडतो. याच गोष्टीचा फायदा घेत उस्मानाबादच्या मजूर सोसायट्यांनी सभेला, प्रचाराला कार्यकर्ते मिळतील अशी जाहिरात दिली आहे. त्यासाठी या सोसायट्यांकडे नोंदणी करावी लागणार आहे. या सोसायट्यांद्वारे प्रत्येक राजकीय पक्षाला कमीत कमी 2 हजार आणि जास्तीत जास्त हवे तेवढे कार्यकर्ते पुरवले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक मजुराला प्रतिदिवस 1 हजार रुपये मजुरी द्यावी लागणार आहे.

Related posts: