|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून आर्शीवाद संपत नाही – नितीन गडकरी

नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून आर्शीवाद संपत नाही – नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते. तसेच नागपूरमध्ये पाच वर्षात जे काम केले, त्याच्या आधारावर लोकांसमोर जाऊन मत मागेन, असेही गडकरी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काल दुसरी यादी जाहीर केली. 21 उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यात नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत रंगणार आहे. याविषयी विचारले नितीन गडकरी म्हणाले, सगळय़ांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावे. मी जे पाच वर्षात काम केले, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेन. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. मी राजकारणात अशाप्रकारची दुश्मनी ठेवली नाही, ठेवतही नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

Related posts: