|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » परूळेकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

परूळेकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

राज्य शासनाच्या वतीने नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव परूळेकर यांना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानाचा पुरस्कार मिळाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

परूळेकर यांनी धरणग्रस्त, भूमीहिन, शहीद विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, गुंठेवारीधारक, बेघर झोपडपट्टीवासीय अशा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी 40 वर्षे कार्य केले आहे. या सामाजिक कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला आहे. रोख 15 हजार रूपरे, गौरव चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार देवयानी फयांदे, आमदार सीमा हिरे, आमदार भाई गिरकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई मंत्रालयाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, पुणे समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, आमदार भाई गिरकर, आदी उपस्थित होते.

Related posts: