|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » उद्योग » एलआयसीच्या चेअरमनपदी एम.कुमार नियुक्त

एलआयसीच्या चेअरमनपदी एम.कुमार नियुक्त 

नवी दिल्ली :  

एम कुमार यांची बुधवारी चेअरमन ऑफ लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार हे या अगोदर विभागीय प्रमुख म्हणून उत्तर विभागाचा कारभार सांभाळत होते. सदरची निवड अर्थमंत्रालयाकडून करण्यात आली असून ती आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली आहे.

टी. एस. सुशिलकुमार व विपिन आनंद यांची आगामी पाच वर्षांसाठी एलआयसीच्या कार्यकारी संचालकपदी निवड करण्यात आली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. टी.एस सुशिलकुमार आणि विपीन यांनी दक्षिणचे विभागीय मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.