|Friday, May 24, 2019
You are here: Home » उद्योग » हार्ले डेव्हिडसन उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबविणार

हार्ले डेव्हिडसन उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबविणार 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

अमेरिकेतील दुचाकी निर्मितीच्या व्यवसायात कार्यरत असणारी हार्ले डेव्हिडसन भारतातील उत्पादनात लवकरच बदल करण्यासाठी योजना तयार करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात देशात सध्या उपलब्ध असणाऱया 1600 सीसी क्षमतेच्या वरील उत्पादनात बदल करण्यासाठी कंपनी नव्याने योजना तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या कंपनीच्या उत्पादन करण्यात येणाऱया दुचाकीत 90 टक्के वाटा हा 1600 सीसी क्षमता असणाऱया दुचाकीचा आहे.

कंपनीने 1200 सीसीचे मॉडेल 48 स्पेशल बाजारात उतरवले असून त्याची शोरुम किंमत 10.98 लाख रुपये आहे. त्यासोबतच कंपनी भारतात 1600 सीसीहून अन्य चार दुचाकी देशात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महत्वाच्या दुचाकांची विक्री वर्षाला 600 हून अधिक होत असल्याचे नेंदवण्यात आले आहे.

 बाजारातील अभ्यास करुनच योजना तयार करणार आहे आणि त्यानंतरच ते भारतीय बाजारापेठेत नवीन उत्पादनासह उतरणार असल्याचे कंपनीचे भारतातील संचालक संजीव यांनी यावेळी म्हटले.

 

 

Related posts: