|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माढा मतदारसंघातून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी द्यावी: सदीप मांडवे

माढा मतदारसंघातून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी द्यावी: सदीप मांडवे 

वार्ताहर /औंध :

माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे यांनी केली आहे.

    आयुक्त पदाच्या माध्यमातून देशमुख यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी व्यापक चळवळ उभी केली आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आजही ही चळवळ काम करते आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून त्यांनी भरीव स्वरुपाचा निधी सिमेंट बंधारे बांधण्यासाठी माण-खटाव तालुक्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी असलेली नाळ कायम जपली आहे. म्हणूनच सामान्य जनतेला ते आपले वाटतात.

   माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिह्यातील खटाव कोरेगाव, माण आणि कोरेगाव तालुक्यातील भाग आहे. या भागातील जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराची आतापर्यंत पाठराखण केली आहे. त्यामुळे माण सारख्या दुष्काळी तालुक्यातील पाणीदार नेतृत्व म्हणून मतदार संघात ओळख असलेल्या प्रभाकर देशमुख यांना या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी पक्षाने द्यावी, त्यांना उमेदवारी दिली तर माण-खटाव तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, अशी भावना मांडवे यांनी व्यक्त केली आहे.

Related posts: