|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लाईफकेअर हॉस्पिटलला 22 लाखाचा गंडा

लाईफकेअर हॉस्पिटलला 22 लाखाचा गंडा 

प्रतिनिधी /चिपळूण :

मिरजोळी येथील लाईफकेअर रूग्णालयात 50 केव्हीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून देण्याच्या आश्वासन देत नवीन पनवेल येथील उत्कर्ष एनर्जी सर्व्हीसेस प्रा. लिमिटेडच्या चार संचालकांनी 22 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर दोन महिला संचालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेमंत काशिनाथ पुजारी, धनंजय वामन गायकवाड, विद्या हेमंत पुजारी, नीता सुनील शुक्ला अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे असून  डॉ. शमशुद्दीन परकार यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, वरील चौघांनी आपण नवी पनवेल येथील उत्कर्ष एनर्जी सर्व्हीसेस प्रा. लि. कंपनीचे संचालक असल्याचे सांगून लाईफकेअर रूग्णालयाच्या टेरेसवर 50 केव्हीचा सौरऊर्जा प्रकल्प 15 डिसेंबर 2018पर्यंत बसवून देण्याचे आश्वासन दिले होते.  यासाठी त्यांनी 18 जुलै 2018 पासून अनेकदा आरटीजीएस पद्धतीने 22 लाख 5 हजार रूपये जमा करून घेतले होते.

मात्र प्रकल्प उभारण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही.  तसेच साक्षीदार महेश आगावणे यांनाही शिविगाळ केली. त्यामुळे या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पडय़ाळ करीत आहेत.

Related posts: