|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लांजातील पतसंस्थेत 28 लाखाचा अपहार

लांजातील पतसंस्थेत 28 लाखाचा अपहार 

प्रतिनिधी /लांजा :

 लांजा शहरातील मराठा हितवर्धिनी सहकारी पतसंस्थेमध्ये 28 लाखांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पतसंस्थेचा कर्मचारी दीपक मोरे आणि पिग्मी एजंट मृणालिनी आयरे या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 ते 2017 या कालावधीत पतसंस्थेची बनावट कागदपत्रे, खातेपुस्तके, खोटी पावतीपुस्तके छापून या कर्मचाऱयांनी लाखोंचा अपहार केल्याची तक्रार संस्थाध्यक्षांनी दाखल केली आहे. 

   लांजातील मराठा हितवर्धिनी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विवेक शिवाजीराव सावंत यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पटसंस्थेच्या नावाने खोटी आणि बनावट कागदपत्रे, खातेपुस्तके, पावतीपुस्तके तयार करून आणि पिग्मी खातेधारकांच्या पुस्तकांमध्ये खाडाखोड करून कर्मचारी दीपक हनुमंत मोरे, पिग्मी एजंट मृणालिनी दत्ताराम आयरे या दोघांनी 2013 ते 2017 या कालावधीमध्ये पतसंस्थेला हा गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 तब्बल 28 लाख रुपयांची ही अफरातफर असून याबाबत गेली दोन वर्षे पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू होती. या चौकशीअंती हे दोघे कर्मचारी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी अध्यक्ष विवेक सावंत यांनी या  दोघांविरोधात भा.द.वि.क. 420, 23, 120(ब), 403, 406, 415, 417, 465, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: