|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रोहन कदमची अष्टपैलू चमक कर्नाटकाकडे पहिल्यांदाच ‘मुस्ताक अली चषक’

रोहन कदमची अष्टपैलू चमक कर्नाटकाकडे पहिल्यांदाच ‘मुस्ताक अली चषक’ 

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी :

कर्नाटकाचे युवा फलंदाज, बेळगावचा अष्टपैलू आणि डावखुरा शैलीदार फलंदाज रोहन प्रमोद कदम व मयांक अगरवाल यांच्या झंजावती अर्ध शतकाच्या जोरावर कर्नाटकाने ऐतिहासीकची नेंद करताना बलाढय़ महाराष्ट्र संघाचा 8 गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच सैय्यद मुस्ताक अली टी-20 चषकावर आपले नाव कोरले.

रोहन प्रमोद कदम, मयांक अगरवाल, करूणा नायर, बी. आर. शरद यांच्या भक्कम फलंदाजीमुळे आणि विनयकुमार आर., मिथून ए., कौशिक व्ही., सुजीत जे., श्रेयस गोपाळ यांच्या अचूक गोलंदाजीमुळे कर्नाटकाने या महत्वपूर्ण स्पर्धेत साखळी त्यानंतर अव्वल साखळी व अंतिम फेरीत अपराजित राहत या स्पर्धेत नवा इतिहास निर्माण करताना पहिल्यांदाच हा चषक जिंकून बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बीसीसीआय आणि मध्यप्रदेश क्रिकेट राज्य संघटना आयोजित गुरूवारी इंदोर येथील होळकर स्टेडियमवर  झालेल्या अंतिम सामन्यात बेळगावचा अष्टपैलू आणि डावखुरा शैलिदार फलंदाज रोहन प्रमोद कदम याने या स्पर्धेत चमकदार व सर्वोच्च कामगिरी करताना तीनवेळा नाबाद खेळी करत 580 धावांचा वैयक्तीक डोंगर उभा करून बीसीसीआयच्या या महत्वपूर्ण स्पर्धेत उतुंग कामगिरी केली. रोहन कदमने या स्पर्धेत कर्नाटकाला अजिंक्मयपद मिळवून देणार असा विश्वास यापूर्वी  त्याने तरुण भारत क्रीडा प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला होता. गुरूवारी रोहन प्रमोद कदमने अंतिम फेरीत कर्नाटक संघाला पहिल्यांदा हा चषक मिळवून देण्यासाठी संयमी व तितकीच झंजावती फटकेबाजी करत 60 धावा काढताना 3 उत्तुंग षटकार व 4 चौकार सीमापार पिटाळले व आपला विश्वास सार्थ ठरविला.

Related posts: