|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिराळा पुरवठा विभागात ’डाळीवर’ डल्ला…!

शिराळा पुरवठा विभागात ’डाळीवर’ डल्ला…! 

महादेव पाटील /शिराळा :
शिराळा महसूल विभागांतर्गत सुरू असणाया पुरवठा विभागाने स्वस्थ धान्य दुकानदारांच्या डाळी वरती डल्ला मारला आहे. हा डल्ला थोडा तोडका नसून तब्बल हजारो किलो डाळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भात गुप्तता ठेवण्यासाठी शिराळा पुरवठा अधिकायाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना दमही दिला जात असल्याच्या गुप्त चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीही झाले असल्याचे समजून येत आहे.गरिबांना मिळणाया डाळीवर डल्ला मारणाया पुरवठा विभागाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तालुक्यात सध्या स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या 115 इतकी आहे. या 115 स्वस्त धान्य दुकानदारांच्या मध्ये काही परवाने सहकारी संस्थांना देण्यात आले आहेत. तर काही परवाने व्यक्तीगत खाजगी स्वरूपात देण्यात आलेले आहेत. शिराळा तालुका हा विस्ताराने मोठा व डोंगररांगात विभागला असल्यामुळे छोटय़ा-मोठय़ा वाडय़ा-वस्त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावरती आहे. त्यामुळे सहाजिकच येथील स्वस्त धान्य परवानाधारकांची संख्याही इतर तालुक्यांच्या तुलनेत काहीशी जास्त आहे. सर्वसामान्य लोकांना वेळेत स्वस्त धान्य सुविधा उपलब्ध व्हावी व शासकीय सुविधा त्यांना मिळावी हा हेतू शासनाचा आहे.
विस्ताराने व लोकसंख्येने मोठय़ा असणार्या या तालुक्यात महिन्याकाठी जवळपास शेकडो टनाने स्वस्त धान्य शासन दरबारातून सर्वसामान्यांच्या साठी पाठविले जाते आहे. पाठविल्या जाणाया धान्यामध्ये प्रामुख्याने गहू, तांदूळ, डाळ व साखर अशा धान्य वस्तूंचा समावेश राहतो. कुटुंबातील व्यक्ती संख्येनुसार धान्याचे वाटप करण्यात यावे व त्यानुसारच शासन दरबारातून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पाठविले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे गहू दीड किलो, तांदूळ एक किलो असे प्रमाण राहते. तर साखरेचे व डाळीचे प्रमाण काहीसे बदलत्या स्वरूपात राहत असल्याचे नागरिकांच्या कडून समजून येते आहे.

Related posts: