|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » leadingnews » न्यूझीलंडमध्ये मशिदीतल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, बांगलादेशची टीम सुदैवाने थोडक्यात बचावली

न्यूझीलंडमध्ये मशिदीतल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, बांगलादेशची टीम सुदैवाने थोडक्यात बचावली 

ऑनलाईन टीम /  वेलिंग्टन : 

न्यूझीलंडच्या साऊथ आयलंड सिटीतल्या एका मशिदीमध्ये अज्ञातानं गोळीबार केला आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या गोळीबारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अज्ञातानं केलेल्या या गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे एक शूटर उपस्थित आहे. पोलीस त्याचा सामना करत आहेत. परंतु या गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. सेंट्रल ख्राइस्टचर्चच्या प्रशासनाने  लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशिदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. तर शेजारी असलेल्या दुसऱ्या मशिदीला रिकामी करण्यात आले  आहे.
https://twitter.com/TamimOfficial28/status/1106374964779708416
बांगलादेशची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. घटनास्थळी बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते. बांगलादेशातील क्रिकेट टीमचा खेळाडू तमीम इक्बालने  ट्विट करत याची माहिती दिली आहे. गोळीबारात पूर्ण बांगलादेशची टीम थोडक्यात बचावली आहे. हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचंही तमीम इक्बालने  सांगितले  आहे.