|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; आजीवन बंदी उठवली

श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; आजीवन बंदी उठवली 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा झालेला टीम इंडियाचा गोलंदाज श्रीसंतला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. बीसीसीआयकडून श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली असून श्रीसंतला यापुढेही क्रिके़ट खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला श्रीसंतवर बंदी घातलेल्या निर्णयाचा तीन महिन्यात पुर्नविचार करण्याचा आदेश दिला आहे. 

श्रीसंतने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. कनिष्ठ न्यायालय आणि हायकोर्टानेही श्रीसंतला दिलासा दिला असताना बीसीसीआयकडून बंदी हटविण्यात आली नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयाला श्रीसंतने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. यावर सुप्रीम कोर्टाने श्रीसंतवरील बंदी हटवली आहे. श्रीसंतने सुप्रीम कोर्टाचे आभार मानताना म्हणाला, कोर्टाच्या या निर्णयामुळे मला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार आहे.