|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत ?

काँग्रेस खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत ? 

ऑनलाईन टीम /  पुणे  : 

हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर राजीव सातव निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात.
राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. गुजरातची लढाई काँग्रेससाठी महत्त्वाची असल्याने सातव यांना तिथेच काम करण्याची इच्छा आहे. मात्र आता हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचे याचा निर्णय राजीव सातव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपवला आहे.

Related posts: