|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेनेच मुंबईचे वाटोळे केले : जयंत पाटील

शिवसेनेनेच मुंबईचे वाटोळे केले : जयंत पाटील 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती. असा टोला लगावतानाच मुंबईचे वाटोळे शिवसेनेने केले अशी जोरदार टिकाही जयंत पाटील यांनी केली. महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला पूल कोसळल्याच्या दुर्घटनेसाठी जाब विचारला पाहिजे. तकलादूपणा बंद करा. ऑडिट फेल झाले ही बाब गंभीर आहे. सरकारचे कामाकडे लक्ष नाही असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला.

 

सीएसएमटी येथे घडलेल्या घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भेट दिली. शिवाय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. त्यानंतर मिडीयाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली आहे परंतू या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यू झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं होते त्यानंतरही घटना घडली. याचा अर्थ स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतं हे पहिल्यांदा कळले आहे. ऑडिट करताना वरवर काम केले गेल्sढ त्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

 

 

Related posts: