|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित ; अन्य दोघांची चौकशी

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित ; अन्य दोघांची चौकशी 

ऑनलाईन टीम / मुंबई

गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 6 पादचाऱयांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. या सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई पालिकेकडून करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार दोन अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोन वरि÷ अधिकाऱयांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

या दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए.आर पाटील, सहाय्यक अभियंता एस. एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर मुख्य अभियंता एस. ओ कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱया जे.डी देसाई या कन्सल्टंटला काळय़ा यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून समजले आहे.