|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » कर्तारपूर यात्रेकरूंवर बंधने; भारताची पाकवर टीका

कर्तारपूर यात्रेकरूंवर बंधने; भारताची पाकवर टीका 

वृत्तसंस्था/ चंदीगढ

पंजाबमधील आणि देशातील शीख भाविकांची सोय व्हावी म्हणून केंद्रातील भाजप सरकारने पाकिस्तानात जाणारा कर्तारपूर मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तारपूर येथे शीखांचे पवित्र धर्मस्थान आहे. तथापि, पाकिस्तानने भारत सरकारच्या या प्रयत्नात अडथळे आणण्यास प्रारंभ केला आहे, अशी टीका भाजपच्या पंजाब शाखेचे अध्यक्ष श्वेत मलिक यांनी शुक्रवारी केली.

भारताने पाकिस्तानकडे प्रतिदिन 5 हजार शीख यात्रेकरूंना कर्तारपूरला विना व्हिसा येऊ द्यावे, अशी मागणी केली आहे. तथापि, पाकिस्तानने ती अद्याप मान्य केलेली नाही. तसेच केवळ 500 यात्रेकरूंना प्रतिदिन अनुमती दिली जाईल, असे म्हटले आहे. तसेच यात्रेकरूंना पायी चालत यात्रा करण्यास अनुमती दिली जाणार नाही. ज्यांना पायी यात्रा करावयाची असेल त्यांना विशेष अनुमती घ्यावी लागेल, अशा अनेक अटी पाकिस्तानने घातल्या आहेत. यावरून पाकिस्तानला शाख यात्रेकरूंच्या भावनांबद्दल कोणतीही आस्था नाही हेच दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.

पाकिस्तानला शीख यात्रेकरूंबद्दल तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांच्याबद्दल कोणताही आदर नाही. कर्तारपूर प्रकरणाचा उपयोग पाकिस्तान केवळ आपली प्रतिमा सुधारण्यासाठी करून घेत आहे, असाही आरोप मलिक यांनी केला.

Related posts: