|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राजकीय पक्षांना मिडीया मॉनिटरींग प्रमाणिकरण गरजेचे

राजकीय पक्षांना मिडीया मॉनिटरींग प्रमाणिकरण गरजेचे 

राजकीय पक्षांना मिडीया मॉनिटरींग प्रमाणिकरण गरजेचे

प्रतिनिधी/ कोल्हापूर

फेक न्युजवर कार्यवाही करण्यासाठी देशपातळीवर आयटी ऍक्टमध्ये दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. सोशल मिडीयावर उमेदवाराची प्रसिध्दी अथवा तिरस्कार याग्य नाही. मिडीया मॉनिटरींग कक्षाकडून प्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय राजकीय पक्षांना, उमेदवारांना सोशल मिडीयावर प्रचार करता येणार नाही.  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ’निवडणूका आणि सोशल मीडिया’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, देशामध्ये साधारण 900 दशलक्ष मतदार 2019 च्या निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत.  कोल्हापूर जिल्हयामध्ये साधारण 32 लाख 75 हजार मतदार आहेत. देशामध्ये सहाशे दशलक्ष मोबाईल इंटरनेट वापरकर्ते आहेत ते दिवसातील दोनशे मिनिटे सोशल मिडीयावर खर्च करीतात. या माध्यमांद्वारे कमी वेळेत फार मोठया समुहापर्यंत संदेश पोहचू शकतो.  सोशल मिडीयाच्या वापरामध्ये राजकीय पक्षांमध्ये सुसंगती असली पाहिजे. कारण राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मिडीयाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल,

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले,  सोशल मिडीयाच्या वापराबाबत तरूण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज आहे.  समाजा व देशामध्ये तेढ निर्माण होणार नाही यासाठी मेसेज फॉर्वर्ड करीत असताना नेहमी जागृक असले पाहिजे.  इंटरनेट हे सध्या जीवन जगण्यासाठीचे अनिवार्य साधन झालेले आहे. इंटरनेट, सोशल मिडीया या सारख्या महासागरामध्ये वावरताना संस्कार हेच योग्य होकायंत्र होवू शकते.  विवेक, संवाद, सुसंवाद या त्रिसुत्रीचा उपयोग सोशल मिडयाचा वापर करताना प्रत्येकान केला पाहिजे.

पद्मश्री सुधाकर ओलवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ.निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ.शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळीत, आयटी तज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ.रविंद्र चिंचोळकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह विविध अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Related posts: