|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कामगार कल्याण मंडळ आयुक्तपदी महेंद्र तायडेंची नियुक्ती

कामगार कल्याण मंडळ आयुक्तपदी महेंद्र तायडेंची नियुक्ती 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रभारी कल्याण आयुक्त पदावर महेंद्र तायडे यांची राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली. ते सध्या मंडळाच्या निधी वसुली शाखेचे सहाय्यक कल्याण आयुक्त म्हणून कार्यरत होते.

  आयुक्त महेंद्र तायडे हे मुळचे जळगाव जिल्हय़ातील मात्र त्यांचा जन्म व संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये झाले. आयुक्त पदावर नियुक्ती होण्यापुर्वी त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953नुसार वरिष्ठ निधी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच मंडळाच्या मुख्य कार्यालयातील लेखा अधिकारी, इमारत, भांडार व विधी शाखा या विभागांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. मंडळाच्या पुणे व ठाणे विभागीय कार्यालयात त्यांनी सहाय्यक कल्याण आयुक्त हे पद सांभाळताना त्यांनी तळागाळातील कामगार व कुटुंबीयांपर्यंत योजना व उपक्रम पोहचविण्याचे यशस्वी कार्य केले आहे. 2007 ते 2011 या कालावधीत निधी वसुली शाखेचे सहाय्यक कल्याण आयुक्त असताना त्यांनी मंडळासाठी आजपर्यंत जास्तीत जास्त निधी वसुलीचे उच्चांक स्थापन केलेले आहेत. आता त्यांची प्रभारी कल्याण आयुक्तपदी निवड झाल्याने कामगारांसाठी निधी मिळविणे, कल्याणकारी उपक्रम, योजना राबविण्याकरीत सक्षम प्रयत्न होतील.

 

Related posts: