|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विकासकामांबाबत विचाणाऱयांच्या बुध्दीची कीव येते : खासदार महाडिक

विकासकामांबाबत विचाणाऱयांच्या बुध्दीची कीव येते : खासदार महाडिक 

कोल्हापूर

तीस-तीस वर्षे रखडलेले प्रश्न सोडवले. त्यामुळे कोल्हापूर कोकण रेल्वेशी जोडले गेले. मराठा आरक्षण, महिलांना रेल्वेमधील सुरक्षा, मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप, शिवाजी पुलाला पर्यायी पूल तयार होण्यासाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यात बदल, अशी अनेक कामे करूनही काहीजण कुठली विकासकामं झाली, असा प्रश्न विचारतात, त्यांच्या बुध्दीची कीव येते. हिम्मत असेल तर विरोधकांनी विकासाच्या मुद्यावर बोलावे, असे आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. दौलतनगर परिसरातील महिला कार्यकर्त्यांचा मेळावा खरे मंगल कार्यालयात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या खरे मंगल कार्यालयात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेविका रूपाराणी निकम, सुनंदा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. विमानतळ, पर्यायी शिवाजी पूल, बास्केट ब्रिज, कोकण रेल्वे यासारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिली. तीस-तीस वर्षे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वाला नेले. पण तरीही अंधळय़ाचं सोंग घेतलेल्या विरोधकांना हा विकास कधी दिसणारच नाही, अशी त्यांनी टिका केली.

या मेळाव्याला सौ. अरूंधती महाडिक यांनीही संबोधित केले. यावेळी विश्वराज महाडिक, महेश वासुदेव, महेश गायकवाड, संग्राम निकम, पद्मावती पाटील, काका पाटील, शुभांगी पालकर, अलका वाघेला, रेखा आगलावे, सुवर्णा पोवार, उदय शेटके यांच्यासह महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: