|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 3 लाख 16 हजारांची लाच मागणाऱया तहसीलदाविरुध्द गुन्हा दाखल

3 लाख 16 हजारांची लाच मागणाऱया तहसीलदाविरुध्द गुन्हा दाखल 

@ प्रतिनिधी / सोलापूर

भूसंपादन कार्यालयाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱया एकून रक्कमेच्या 2.5 टक्के म्हणजे साधारण 3 लाख 15 हजार 877 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कंत्राटी नायब तहसीलदार नरसिंह एकनाथ कुलकर्णी (वय 67, रा. अंत्रोळीकरनगर, सोलापूर) यांच्या विरोधात शुक्रवारी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांच्या मित्राची शेती भूसंपादन कार्यालयाकडून संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या बदल्यात तक्रार यांच्या मित्राला 1 कोटी 26 लाख 35 हजार 100 रुपये इतका मोबदला मिळणार होता. या रक्कमेच्या 2.5 टक्के म्हणजेच साधारण 3 लाख 15 हजार 877 रुपये एवढय़ा रक्कमेची मागणी कंत्राटी तहसिलदार कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 2 नोव्हेंबर 2018 रोजी लाच लुचपतच्या पथकाने पडताळणी केली. त्यामध्ये कुलकर्णी याने रक्कमेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी कंत्राटी नायब तहसीलदार कुलकर्णी विरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कुलकर्णी यास अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.