|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नापिकीमुळे मुळेगावात शेतकऱयाची आत्महत्त्या

नापिकीमुळे मुळेगावात शेतकऱयाची आत्महत्त्या 

प्रतिनिधी / सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगावात सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून ज्ञानेश्वर हरिबा केत (वय 45) यांनी रोगर नावाचे कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

ज्ञानेश्वर यांची मुळेगाव परिसरात साधारण दीड एकर शेती आहे. यातून कुटुंबासाठी उत्पन मिळेल यासाठी त्यांनी विहीर घेतली होती. परंतु मागील काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे विहीरीने सतत चार वर्षापासून तळ गाठला आहे. त्यातच गरजा भागविण्यासाठी त्यांनी काही लोकांकडून कर्ज घेतले होते. सुमारे एक लाख रुपये घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. शेतातून मिळणारे उत्पन शून्य आणि दररोजच्या गरजा भागविणे यामुळे ज्ञानेश्वर अनेक दिवस चिंतेत होते. याच त्रासातून 11 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या शेतात रोगर नावाचे कीटनाशक प्राशन केले होते. बेशुध्द अवस्थेत त्यांना मुलगा गणेश यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. मात्र शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर हे उपचारा दरम्यान मरण पावले.

ज्ञानेश्वर यांच्या पत्नीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले आहे. तर सचिन (वय 25)  व गणेश (वय 22) अशी दोन मुले आहेत. गणेश हे दाळमिलमध्ये मजूर म्हणून काम करतात तसेच सचिन हे मजूर म्हणून मिळेल तेथे काम करतात. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Related posts: