|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अवैध वाळू प्रकरणी 7 वाहने पकडली!

अवैध वाळू प्रकरणी 7 वाहने पकडली! 

प्रतिनिधी/ गुहागर

तालुक्यातील अवैध वाळू उपसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नरवण-पंघरवणे येथे अवैध वाळू उपसा करणारी तब्बल सात वाहने पकडून ती महसूलच्या ताब्यात दिली. मात्र यातील तीनच वाहनांमध्ये वाळू सापडली व तीही फक्त पाव ब्रास असा अहवाल नरवण तलाठय़ानी तहसीलदारांना पाठवला आहे. अन्य चार वाहनांपैकी दोन वाहने होळीची लाकडे व जीओच्या मोबाईल टॉवरचे सेंट्रींग उतरण्यासाठी त्याठिकाणी आली होती असे म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक दर्वेश शेलार यांनी आपल्या सहकाऱयांसह नरवण पंघरवणे येथील समुद्रकिनाऱयावर वाळू भरण्यासाठी गेलेल्या सात वाहनांना गुरूवारी सायंकाळी 8 वाजता पकडले. ही वाहन येथील पोलीस ग्राऊंडवर आणून महसूलच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

यामध्ये वाहनचालक नितेश भिकाजी रेवाळे (38, ओमळी, ता. चिपळूण), वाहन मालक रविंद्र अनंत जाधव (नरवण), दिलीप जगन्नाथ नाटूस्कर (49, नरवण, पंघरवणे), उदय रघुनाथ गडदे (45, हेदवी भंडारवाडा), दीपक दत्ताराम मांडवकर (43, राहणार नरवण केळपाटवाडी), विराज विठोबा रसाळ (27, हेदवी गणपतीमंदिर), प्रितेश दशरथ पाटेकर (21, नरवण पंघरवणे), शैलेश राजाराम हळदणकर (40, हेदवी भंडारवाडा) यांची ही वाहने आहेत. या वाहनांमध्ये 407, 709 या वाहनांचा समावेश आहे.

दरम्यान, या वाहनांपैकी केवळ दिलीप जगन्नाथ नाटूस्कर, उदय रघुनाथ गडदे, प्रितेश दशरथ पाटेकर यांच्या तीन वाहनांमध्ये पाव ब्रास वाळू होती. मात्र अन्य चार वाहनांपैकी दोन वाहने होळीची लाकडे व जीओच्या मोबाईल टॉवरचे सेंट्रींग उतरण्यासाठी त्याठिकाणी आली होती, असा जबाब वाहनचालकांचा घेण्यात आला आहे. त्यानुसार नरवणचे तलाठी प्रविण भालचिम यांनी या वाहनांचा अहवाल तहसीलकडे टपालाद्वारे पाठवला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

Related posts: