|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » टेम्पो उलटून 31 जखमी, 11 गंभीर

टेम्पो उलटून 31 जखमी, 11 गंभीर 

प्रतिनिधी/ दापोली

सहाणेवर देवाची पालखी पोहोचवून परतणाऱया भाविकांचा टेम्पो उलटून झालेल्या अपघात 31 जण जखमी झाले. यातील 11 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात दापोली तालुक्यातील कर्दे येथे खैराचा कोंड येथे गुरूवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडला.

  एका बाजूला समुद्रकिनारा व दुसऱया बाजूला डोंगर अशा चिंचोळय़ा जागेत हा गाव वसला आहे. खेमराजदेवचा शिमगोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होता. मुस्लिम समाजही त्यात सहभागी होतो. गुरूवारी खैराचा कोंड ग्रामस्थांनी दिवसभर पालखी फिरवून साडेदहाच्या सुमारास पुन्हा सहाणेवर आणून ठेवली.

  त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास भाविक घरी जाण्यास निघाले. टाटा 407 गाडीच्या हौद्यात बसून सुमारे 35जण निघाले होते. ही गाडी एका वळणावर समुद्राच्या बाजूला कलंडली. यामुळे गाडीतील भाविक समुद्राच्या वाळूत व तेथील काळय़ा दगडांवर फेकले गेले. त्यामुळे अनेक जणांना किरकोळ तर काहींना गभीर दुखापत झाली.  रस्त्याने जाणाऱया गाडय़ा थांबवून व त्यातंतर रूग्णवाहीकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात आणून दाखल केले.

  प्रकाश जाधव, पंकज पेवेकर, विजय काष्टे, अथर्व पाष्टे, स्वप्नील कलमकर, जयहिंद भुवड, सुभाष पेवेकर, संदेश मिसाळ, सुहास शिगवण, सूरज पेवेकर, अंकुश गुरव, चंद्रकांत मिसाळ, सुरेश शिगवण, संजय मिसाळ, राकेश जोशी, प्रतिक काष्टे, नीलेश खामकर, स्नेहदीप घडसे, अनिल पेवेकर, सर्वेश बेनेरे, मधुकर पेवेकर, गणेश जाधव, विष्णू मिसाळ, प्रणित बेनेरे, जनार्दन पेवेकर, शशिकुमार मिसाळ, पंकज छांदिया, सुजय, सागर पेवेकर, अजय पेवेकर, प्रितम आगरकर अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांवर शहरातील उपजिल्हा रूग्णलयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांतील गंभीर जखमी सूरज पेवेकर, सागर पेवेकर, राकेश जोशी यांना मुंबईत, विजय काष्टे, जयहिंद भुवड, स्वप्नील कलमकर, अथर्व मिसाळ यांना चिपळूण येथील डेरवण व सुजय खामकर, संजय मिसाळ, संजय पेवेकर, प्रकाश जाधव यांना अधिक उपचारासाठी महाड येथे हलवण्यात आले.

मानाचा गणपती कार्यकर्ते धावले!

  या उपघाताचे वृत्त समजताच शहरातील लोकमान्य टिळक चौकातील मानाचा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दोन रूग्णवाहिकांसमवेत मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.  यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यात सचिन गायकवाड, रोहित शिंदे, संदीप केळकर, साई देसाई, अरविंद पुसाळकर, राहुल शिंदे आदींनी सहभाग घेतला.  

पुलाच्या आठवणी जाग्या

  कर्दे गाव व मस्लिम समाजाचे कब्रस्तान यात एक छोटी नदी आहे. काही वर्षांपर्यंत या नदीवर एक लोखंडी साकव होता.  एका व्यक्तीला दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेत असताना हा लोखंडी साकव मोठा आवाज करत तुटला. यामुळे खांदेकऱयांसह अनेकजण पाण्यात पडले, तर काही साकवात अडकले होते. या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

Related posts: