|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शेतकऱयांसाठी जिल्हा बँकेने अनेक योजना राबविल्या

शेतकऱयांसाठी जिल्हा बँकेने अनेक योजना राबविल्या 

प्रतिनिधी/ सातारा

टांझानिया ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँकेच्या आय. टी. विभागाच्या अधिकाऱयांनी नुकतीच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस कोअर बँकींग प्रणालीची पाहणी करण्यासाठी भेट दिली. यावेळी टांझानिया ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँकेचे आय. टी. हेड. श्री डेरिक, व इतर मान्यवरांचे स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले. 

 या भेटीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेची स्थापना भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाणांनी केलेली आहे.  शेतकऱयांना केंद्रस्थानी ठेवून त्याचा सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. बँकेसस्थापनेपासून ऑडीट वर्ग ‘अ’ व निव्वळ एन. पी. ए. 0 :  असून बँक तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली असून विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत असलेचे नमूद केले. सातारा जिल्हा बँकेचा नावलौकिक संपूर्ण देशात आहे, बँक प्रतिवर्षी शेतकरी सभासद, सहकारी संस्था यांच्यासाठी नफ्यामधून भरीव तरतूद करीत असते. 3 लाख रूपयांपर्यंत शेतकऱयांना शून्य टक्के दराने पीककर्ज देते, या जिह्यात दुष्काळी भाग, अतिपाऊस, कमी पाऊस असे तीन भाग असून त्याप्रमाणे बँकेने विविध कर्ज योजनांचे माध्यमातून शेतकरी सभासदांना कर्जपुरवठा करीत आहे. संस्थांना प्रतिवर्षी नफ्यातून शेअर्स रुपात भरीव रक्कम देते, त्यामुळे संस्थांचे आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. बँकेची 6 दशकांहून अधिक काळ आदर्शवत व उज्वल परंपरा आहे, बँकेच्या ठेवी, कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधीनियोजन, भावीकाळातील अनेकविध नविन विकास योजना, सीबीएस कार्यप्रणालीव्दारे ग्राहकांना जलद सेवा इत्यादी अनुषंगाने सविस्तर माहिती विषद केली.

 तसेच डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भाग-भांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहाय्यता बचतगट, प्रशिक्षणकेंद्र, किसान क्रेडिट कार्ड, विविध कर्ज योजना, बँकेला उत्कृष्ठ कामकाजाबद्दल नाबार्डचे मिळालेले बेस्ट परफॉर्मन्स् ऍवॉर्डस्, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये को-ऑपरेटिव्ह बँक टॉपर म्हणून झालेली नोंद, महाराष्ट्र बँक्स् असोसिएशनचे उत्कृष्ठ कामकाज ऍवॉर्डस् इ त्यादीची माहिती दिली.

 यावेळी टांझानिया ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱयांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कोअर बँकिंग ऍप्लीकेशन सॉफ्टवेअर, त्यामद्दील सर्व तांत्रिक बाबी, वापरलेले तंत्रज्ञान, एटीएम, आरटीजीएस व एनईएफटी, मोबाईल बँकिंग, इंटनेट बँकिंग, मायक्रो-एटीएम सुविद्दा, एमआयएस, ट्रेझरी मॅनेजमेंट, बँकेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेतली. 

 या भेटीप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक आर. एस. गाढवे, एम. व्ही. जाधव, व्यवस्थापक आर. एम. भिलारे, विविध विभागांचे उपव्यवस्थापक, आय. टी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts: