|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम आदर्शवत

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम आदर्शवत 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारातील काम आदर्शवत असलेचे प्रतिपादन उत्तर प्रदेश सहकारी बँकेचे संयुक्त आयुक्त आणि निबंधक योगेंद्र मलिक यांनी केले.

 सहकारी बँकिंग क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात नामांकित बँक आहे. या बँकेने सहकारी कृषी क्षेत्रात दूरदृष्टीने केलेल्या उपाययोजनेच्या यशोगाथेमागे असणाऱया कार्यप्रणालीचा आणि जिह्यातील विकास सेवा संस्था अनिष्ट तफावतीतून इष्ट तफावतीमध्ये येण्यासाठी तसेच विकास सेवा संस्था सक्षमीकरनासाठी बँकेने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेश, राज्य सरकार आणि लखनौ सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची भेट आयोजित केली होती.

 बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेने सेवेचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविले असून अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेने आर. बी. आय. व नाबार्ड यांचे नियम व निकष तंतोतंत पाळले आहेत. बँक स्थापनेपासून ऑडीट वर्ग ‘अ’ मध्ये मोडत असल्याचे सांगितले.

कृषी उत्पादनात भरघोस वाढ

सुनीलचंद्र श्रीवास्तव, उपसचिव, केडर यांनी सातारा जिल्हा बँक ही देशातील एक आदर्शवत बँक असून इतर सहकारी बँकांसाठी रोल मॉडेल असलेचे गौरवोदगार काढले. ग्रामीण भागातील सभासदांच्या कल्याणासाठी व देशाच्या कृषी उत्पादनात भरघोस वाढीसाठी सहकाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केलेले असल्याचे पहावयास मिळाले. सूत्रसंचालन व्यवस्थापक सुजित शेख यांनी केले. यावेळी, जिल्हा बँकेतील सरव्यवस्थापक मधुकर जाधव, राजीव गाढवे, व्यवस्थापक राजेंद्र भिलारे, संजय इथापे तसेच सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधिकारी व सेवक उपस्थित होते.   

Related posts: