|Wednesday, March 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हसन पटेल ‘सोमेश्वर केसरी’ चा मानकरी

हसन पटेल ‘सोमेश्वर केसरी’ चा मानकरी 

प्रतिनिधी/ वडूज

गुरसाळे (ता. खटाव) येथे वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाडय़ात चांगला प्रतिसाद मिळाला. या आखाडय़ात आशियाई सुवर्ण पदक विजेता हसन पटेल याने मुंबई महापौर केसरी भारत मदनेवर मात करत सोमेश्वर केसरीचा बहुमान पटकविला. सुमारे सव्वा लाख रुपये इनामाची ही कुस्ती ही खूप वेळ चालली होती. त्यामध्ये मदने यास दुखापत झाल्याने त्याने कुस्ती सोडून दिल्याने पटेलला विजयी घोषित करण्यात आले.

दुसऱया क्रमांकाच्या कुस्तीत बेनापूर तालमीच्या संतोष सुतारने सातारा तालीम संघाच्या राजेंद्र सूळ वर गुणांच्या आधारे मात करत 1 लाखांचे इनाम जिंकले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत खवसपूरच्या संतोष जगतापने पोकळ घिस्सा लावत भोसले व्यायाम शाळेच्या प्रशांत शिंदेला चितपट केले. गौरव हजारे कुंडल, शुभम मांडवे कुमठे, शुभम राऊत पुणे यांनी चटकदार कुस्त्या करत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पै. विकास जाधव, अर्जुन पाटील, अनिल शेडगे, श्रीमंत जाधव, चंद्रकांत गोडसे, शामराव माने, वसंत जानकर, बापूराव चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले.

कुस्ती कमिटीचे अध्यक्ष मारूती जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, नाना जाधव व सहकाऱयांनी मैदानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.।़

Related posts: