|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘वर्धन’ची ऊस दरात जिह्यात आघाडी

‘वर्धन’ची ऊस दरात जिह्यात आघाडी 

वार्ताहर/ औंध

वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पहिली उचल 2600 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिली.

कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी संचालक मंडळ व शेतकऱयांची बैठक झाली. यात कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी 16 मार्च पासून कारखान्याकडे गळीतास येणाऱया उसाला पहिला हप्ता प्रति टन 2600 रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम जोमात सुरू असताना शेतकऱयांच्या उसाला हक्काचा दर मिळावा म्हणून कारखान्याचे व्यवस्थापन नेहमी प्रयत्नशील असते. मोठय़ा प्रमाणावरील परजिह्यातून होणाऱया उसाची पळवापळवी रोखण्यासाठी, ऊस उत्पादक शेतकऱयांची लुट थांबवण्यासाठी, सभासदांचा विश्वास कारखान्यावरील दृढ करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे.

यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक भीमराव काका पाटील, संपतराव माने, हिंदुराव चव्हाण, सुदाम दीक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्यातील कर्मचारी कै. धनाजी तुकाराम पाटील यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसाठी संचालक मंडळाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली व मदतीचा धनादेश मृत कुटुंबीयांचे नातेवाईकांकडे देण्यात आला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम आदींसह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद शेतकरी, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक भीमराव डांगे यांनी मानले.

Related posts: