|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कॅसिनो हा निवडणुकीचा मुद्दा बनविणार

कॅसिनो हा निवडणुकीचा मुद्दा बनविणार 

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी दिलेली माहिती

प्रतिनिधी/ मडगाव

भाजप सरकार सत्तेवर आल्यास राज्यातील कॅसिनो त्वरित बंद केले जातील, असे आश्वासन सध्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. पण आज त्यांचे सरकार सत्तेवर असून सुद्धा कॅसिनो बंद होत नाहीतच, उलट त्यांचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तेव्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा हा एक मुद्दा बनविण्यात येईल, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी मडगाव रवींद्र भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

  भाजप सरकारने राज्यातील लोकांना फक्त आश्वासने देण्याचे काम केलेले आहे. आम्ही विधानसभेत मुख्यमंत्री पर्रीकर यांना ‘बिग डॅडी’विषयी जाब विचारला असता त्यांनी आम्हाला ही बोट कॅसिनोसाठी वापरली जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही या विषयावर गंभीरपणे भर दिला नाही. पण आता या विषयावर सखोल अभ्यास करून सरकार पक्षाला धारेवर धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरिता दिल्लीमध्ये आमची बैठक होईल व या बैठकीतून योग्य उमेदवाराला तिकीट दिली जाईल. अनेक नेत्यांनी पक्षासाठी कार्य केलेले असून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी अनेक नेते मागणी करत आहेत आणि त्यांचा तो अधिकारही आहे. पक्ष आम्हाला जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्रितपणे झटणार. ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो नेता निराश होणार नाही व काँग्रेसच्या हितासाठीच काम करेल, असे कवळेकर यांनी पुढे सांगितले.

Related posts: