|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला अकादमीत आजपासून ‘आदी महोत्सव’

कला अकादमीत आजपासून ‘आदी महोत्सव’ 

प्रतिनिधी/ पणजी

ट्राईब्स इंडियातर्फे अर्थात ट्रायबय को. ऑप. मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे गोव्यात ‘आदी महोत्सव’ पणजीतील कला अकादमी येथे आयोजित करण्यात आला आहे. तो आजपासून जनतेसाठी खुला झाला आहे. 25 मार्चपर्यंत सदर महोत्सव चालणार असून रविवार 17 रोजी सायंकाळी 7 वाजता आदिवासी पेहराव असलेला फॅशन शो सादर केला जाणार आहे. त्यात मुंबईतील मॉडेल्स भाग घेणार आहेत.

ट्राईब्स इंडियाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. रामनाथम् यांनी कला अकादमी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली. आदिवासी लोकांची हस्तकला, कारागिरी यांना चालना मिळावी, त्यांना व्यासपीठ तसेच बाजारपेठ उपलब्ध व्हावी या निमित्ताने हा महोत्सव घेण्यात येत आहे. हा अकरावा महोत्सव असून फॅशन शोमध्ये आदिवासी कपडे, वस्त्र, आभुषणे यांचा वापर करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हा महोत्सव जनतेसाठी खुला असून त्यात आदिवासी वस्त्रे, हस्तकला, हस्तकारागिरी साहित्य, वस्तू इत्यादींच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून समावेश करण्यात आला आहे. फॅशन शोमध्ये मुंबईतील खास मॉडेल सहभागी होणार आहेत. अनेक कलात्मक वस्तू, साहित्य यांचा समावेश महोत्सवातील प्रदर्शनात आहेत. त्यांची विक्रीही करण्यात येणार असल्याची माहिती श्री. रामनाथन यांनी दिली.

नैसर्गिक साधनांचा वापर करून अनेक उत्पादने तयार करण्यात येत असून त्यांचेही प्रदर्शन महोत्सवात होणार आहे. देशाच्या विविध राज्यांतील 200 हून अधिक आदिवासी कलाकार, हस्तकारागीर त्यांच्या विविध कलाकुसरयुक्त वस्तू, उत्पादने यांच्यासह महोत्सवात सहभागी होणार आहे. आदिवासी कलाकारांनी हस्तकारागिरांनी काही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स साधने तयार केली असून ती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. आदिवासी क्षेत्रातील या महोत्सवास सर्वांनी भेट देण्याचे आवाहन रामनाथन यांनी केले आहे.

Related posts: