|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महिला संगीत नाटय़स्पर्धेचे लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदणी

महिला संगीत नाटय़स्पर्धेचे लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदणी 

प्रतिनिधी/ फोंडा

राज्यभरातील एकमेव महिला संगीत नाटय़स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन हे राजीव कला मंदिराच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरेल. नाटय़स्पर्धेतील पुरूषी पात्रेही स्त्रीयांनी उत्तमरित्या रंगविलेली आहे. संपुर्णरित्या महिलाप्रधान अशी संगीत नाटय़स्पर्धा असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रीकॉर्डमध्ये गवसणी घालण्यासारख्या हा विक्रम असल्याचे प्रतिपादन ‘वंदे मातरम’d व ‘संभवामी युगे युगे’ सारख्या महानाटयाचे रचनाकार दिलीप देसाई यांनी केले.

फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरतर्फे स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती प्रित्यर्थ  आयोजित केलेल्या चौथ्या अखिल गोवा महिला संगीत नाटय़स्पर्धेच्या काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बक्षिस वितरण सोहळय़ाला ते बोलत होते. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक होंडा सत्तरी येथील स्वर सत्तरी महिला पथकाच्या सं. ‘ययाती आणि देवयानी’ यांना प्राप्त झाले. यावेळी प्रमुख पाहूणे ज्येष्ठ नाटय़कलाकार कुमोदिनी उपाध्ये गाळकर, कला मंदिरचे उपाध्यक्ष अजित केरकर, स्पर्धेचे परीक्षक अश्विनी जांबावलीकर व अजय नाईक उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नुकतेच दिवंगत झालेले माजी सभापती तथा कला मंदिरचे माजी अध्यक्ष कै. विष्णू सुर्या वाघ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही महिला संगीत नाटय़स्पर्धा असल्याची  माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना प्रमुख पाहूणे कुमोदिनी गाळकर यांनी विजेत्या पथकांचे अभिनंदन केले व आपल्या नाटकांतील कारकिर्दीविषयी अनुभव कथन केले. अजित केरकर यांनीही महिला कलाकारांना अभिनयाविषयी बारकाव्यांची सविस्तर माहिती दिली.  

स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक नांदोडा येथील गणेश कला संगम संस्थेच्या सं. ‘अयोध्येचा ध्वजदंड’  यांना तर तृतीय पारितोषिक केरी सत्तरी येथील सातेरी छाया सेल्फ हेल्प ग्रुपच्या सं. शिर्डीचे साईबाबा यांना प्राप्त झाले. तसेच केरी पेडणे येथील कुलदेवता आजोबा रवळनाथ महिला नाटय़ मंडळाच्या सं.भाव तोची देव, कुभांरजुवे येथील धाडीला राम तीने का वनी?, तसेच गावणे बांदोडा येथील म्हारेगण देव प्रासादिक नाटय़ मंडळाच्या सं. मत्सगंधा यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

उत्कृष्ट दिग्दर्शन-प्रथम निलेश नाईक (अयोध्येचा ध्वजदंड), द्वितीय शिवनाथ नाईक (ययाती व देवयानी) , तृतीय विष्णू गावस ( शिर्डीचे साईबाबा)

उत्कृष्ट अभिनय: स्त्री भूमिकेसाठी प्रथम-मनिषा परब (देवयानी-सं. ययाती व देवयानी) द्वितीय उर्मिला गावस (सीता-अयोध्येचा ध्वजदंड) , तृतीय सरीता नंदा माजिक  (निवेदक-शिर्डिचे साईबाबा) तसेच प्रणाली मयेकर व नियती गांवस यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

उत्कृष्ट अभिनय: पुरूष भूमिकेसाठी सिद्धि गांवस (लक्ष्मण-अयोध्येचा ध्वजदंड), द्वितीय दिपा तळकर (विचित्रशास्त्री-भाव तोची देव), तृतीय आरोही कवळेकर (भीष्म-मत्सगंधा) यांना तर सौम्य शिरोडकर व सोनम गांवस यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

उत्कृष्ट नेपथ्य: प्रथम राजेंद्र शेटय़े (अयोध्येचा ध्वजदंड), द्वितीय लक्ष्मीदास च्यारी  (अमृत मोहिनी)

उत्कृष्ट प्रकाशयोजना: प्रथम सौरभ बर्वे (अयोध्येचा ध्वजदंड), द्वितीय-रंगनाथ नाईक (ययाती व देवयानी),

उत्कृष्ट ध्वनीसंकलन: प्रथम-दिपक गांवस (ययाती व देवयानी) , द्वितीय-विराज गांवस (शिर्डीचे साईबाबा)

उत्कृष्ट वेशभूषा: प्रथम-अमिता नाईक (अमृत मोहिनी), द्वितीय-सीताराम गावस (अयोध्येचा ध्वजदंड) त्याशिवाय सत्यवान शिलकर यांना प्रशस्तीपत्र.

उत्कृष्ट रंगभूषा: प्रथम-निळकंठ खलप (अयोध्येचा ध्वजदंड), द्वितीय-पंचम नाईक (धाडील राम तिने का वनी ?)

उत्कृष्ट पेटीवादक: प्रथम-महेश गांवस (ययाती व देवयानी), द्वितीय-श्रीपाद फडते (अयोध्येचा ध्वजदंड) त्याशिवाय सृजन सावंत यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

उत्कृष्ट तबलावादक: प्रथम-शैलेश शिरोडकर (ययाती व देवयानी),द्वितीय-प्रसाद कळंगुटकर (अयोध्येचा ध्वजदंड), आनंद आमोणकर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

उत्कृष्ट गायन: स्त्री भूमिका प्रथम-चिन्मयी दामोदर कामत (सत्यभामा- ंसं.सुवर्णतुला), द्वितीय-नियती दिपक गांवस तसेच गौरी भोसले नाईक व अंकीता मोरजकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले.

उत्कृष्ट गायन: पुरूष भूमिका प्रथम-लता महेश गांवस (कच -सं.ययाती व देवयानी), द्वितीय-दिप्ती गावस (राम-अयोध्येचा ध्वजदंड)

उत्कृष्ट लेखकासाठी:मृगया फडते व दिक्षा केरकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट बालकलाकार: प्रथम-कु. मृगना अनिल सावईकर (नारद-सं.सुवर्णतुला),द्वितीय-कु. विभूती केरकर (झिपरी-सं.शिर्डीचे साईबाबा) यांना प्राप्त झाली.

 विजेत्या पथकांना तसेच वैयक्तिक कामगिरीसाठी कलाकारांना प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Related posts: