|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ही निवडणूक उपांत्य सामना असून पुढच्या निवडणुकीत राज्यात गोवा सुरक्षा मंचची सत्ता असेल

ही निवडणूक उपांत्य सामना असून पुढच्या निवडणुकीत राज्यात गोवा सुरक्षा मंचची सत्ता असेल 

प्रतिनिधी/ म्हापसा

येत्या पोटनिवडणुकीसाठी म्हापसा मतदार संघातून गोवा सुरक्षा मंचातर्फे म्हापशातील प्रसिद्ध वास्तुशिल्पकार नंदन सावंत निवडणूक लढविणार असल्याची माहिती गोसुमंचे सर्वेसर्वा प्रा. सुभाष वेलींगकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गोवा सुरक्षा मंच जो आज काही आहे आमची पक्ष बांधणी व आमचा केडर विकास त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आणि राज्यभर जी संघटना आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्याची नेटवर्कींग एक क्रमाकांचे आहे. नॉन पॉलिटीकल संघटना तसेच भाभासुमांचे कार्यकर्तेही गोसुमंच्या पाठीमागे आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री 10 वर्षांनी राज्यात येणार, असे भाकीत आपण 1990 साली केले होते. आणि 2000 साली मनोहर पर्रीकर राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. आज राजकीय परिस्थिती विकोपाला गेलेली आहे आणि जनताही विटलेली आहे. ही निवडणूक आमची उपांत्य सामना असेल. पुढची निवडणूक असेल तेव्हा राज्यात गोवा सुरक्षा मंचाची सत्ता असेल असा ठाम विश्वास श्री. वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी व्यासपीठावर म्हापसा उमेदवार नंदन सावंत, गोवा राज्य अध्यक्ष आत्माराम गांवकर, कार्याध्यक्ष ऍड. स्वातीताई कर्पे केरकर, उपाध्यक्षपरेश रायकर, उत्तर गोवा सरचिटणीस अभय सामंत, म्हापसा मदरासंघा अध्यक्ष किशोर राऊत, महिला राज्य अध्यक्ष ऍड. रोशन सामंत, म्हापसा सचिव शेखर परब, खजिनदार रुपेश राऊत उपस्थित होते.

राजकारण गोसुमंचा धंदा नाही

बीज लावावे लागते तेव्हाच झाड होते. गोसुमंची सत्ता हे ध्येय नसून साधन आहे. आम्ही समाजाचे हित व कल्याण करण्यासाठी बसलो आहोत. आम्ही समाजकारण करतो. राजकारण हा आमचा धंदा किंवा कमवायचे साधन नव्हे. आमचे साधन म्हणजे तडजोडीतून समाजसेवा करणे. यासाठी आम्ही पुढे जात आहोत. एकही उमेदवार निवडून न आल्यास चालेल पण माघार न घेता निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती प्रा. वेलिंगकर यांनी दिली.

भाजप काँग्रेस युक्त भाजपा पक्ष

भाजप सुरुवातीला आयडोलॉजी घेऊन उभे राहील. त्यांनी चार, सहा, सोळा, एकवीस आमदारापर्यंत मजल मारून पक्षाने तत्वनिष्ठा सोडली. काँग्रेसमुक्त भाजपा नव्हे तर काँग्रेसयुक्त भाजपा केले. आज भाजपचे जे आमदार आहेत त्यापैकी किती मुळ भाजपचे आहे यात काँग्रेसचे आयात केलेले लोक आहेत. त्यामुळे जे प्रामाणिक मानसन्मान असलेले लोक राजकारणात आणण्याचा प्रयत्न गोसुमंच करीत आहे. आमचे उमेदवार तरुण व निरव्यसनी उमेदवार आहेत. असे उमेदवार पुढे यायला पाहिजे. मद्याची आमिषे दाखविण्याचे काम करणार नाही. एक स्वज्वल चेहरा नंदन सामंत च्या रुपाने ठेवला आहे व म्हपसा वासीय त्यांना मान्य करून घेतील. असेही ते म्हणाले.

पर्रीकर पणजीतून निवडून आले ही एक ऐतिहासिक गोष्ट

निवडणुकीत बरा चेहरा जनतेपुढे ठेवला, एक निरव्यासनी, समाजकार्यात भाग घेणारा चेहरा तर त्यांना लोक पैशाशिवाय सुद्धा निवडून देतात याचे उत्कृष्ट उदाहरण मनोहर पर्रीकर. म्हापशाचा माणूस आम्ही पणजीकरांनी पणजीत ठेवला त्यावेळी तो केडर, निष्ठावंत होता. त्यांनी पर्रीकरांना निवडून दिले. त्यावेळी खर्चही 26 हजार रुपये झाला होता. म्हापशातील उमेदवार पणजीहून त्यावेळी निवडून येतो ही एक ऐतिहासिक गोष्ट असल्याचे प्रा. वेलिंगकर म्हणाले. आज समाज समजूतदार आहे. त्याच्यात सामंजस्यपणा आहे. प्रत्येकवेळी पैसा वाटप व उधळपट्टी करतात त्याला समाज बळी पडतो असे नाही. स्वाभिमानी समाज अद्याप शिल्लक आहे. तो आम्हाला मतदान करणार म्हापशात जी पोकळी आहे, ती आवश्य भरून काढणार. स्वाभिमानी राजकारण तत्वनिष्ठ राजकारणाची, विचारनिष्ठा राजकारणी, विचारधाराची पोकळी म्हापसा वासीय गोसुमाला मतदान करून भरून काढणार असे प्रा. वेलिंगकर यावेळी म्हणाले.

पुढील विधानसभा निवडणुकीत गोसुमं 35 जागा लढविणार

निरव्यसनी, पैशाअभावी उमेदवार आज निवडून येऊ शकतो काय? असा प्रश्न पत्रकारांनी प्रा. वेलिंगकर यांना केला असता ते म्हणाले, अशी परिस्थिती आम्ही आणायला पाहिजे. सत्तेसाठी कुछ भी! असे आम्ही कधीच करणार नाही. काँग्रेसचे माविन गुदिन्हो यांच्यावर खटले असूनही ते निवडून येतात. असे आम्ही करणार नाही. जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पक्षाचे चिन्ह सर्वत्र पोहोचविण्यासाठी आम्ही लोकसभा निवडणूक लढविली पाहिजे जेणेकरून आम्हाला आपली वोट बॅंकही कळेल. व पोटनिवडणुकीत अधिक लक्ष घालून पुढील विधानसभा निवडणुकीत गोसुमं 35 जागा लढविणार असल्याची घोषणा करीतच आम्ही बाहेर पडलो आहोत. आम्ही लोकसभा लढवू नये असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे दि. 19 रोजी आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे उमेदवारही असून अन्य धोरणही ठिरविले जाईल अशी माहिती यावेळी प्रा. वेलिंगकर यांनी दिली. उद्धव ठाकरे, गोवा प्रभारी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून शिवसेना युतीबाबत अंतिम निर्णय होईल. उद्धव ठाकरेंना बोलावून राज्यात मोठी सभा घेण्याचा निर्णय गोसुमंने घेतला होता पण काही कारणामुळे ती रद्द झाली. विश्वासाने कार्य केल्यास तत्वनिष्ठा कार्यकर्ते घडतात असे त्यांनी सांगितले.

Related posts: