|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेकायदा दारुविक्री करणाऱया युवकाला अटक

बेकायदा दारुविक्री करणाऱया युवकाला अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेकायदा दारुविक्री प्रकरणी अबकारी दक्षिण विभागाच्या अधिकाऱयांनी नंदिहळ्ळी येथील एका युवकाला अटक केली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याजवळून सुमारे 14 हजार 500 रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

संतोष रायाप्पा चौगुले (वय 31, रा. देसूर रोड, शिवाजीनगर, नंदिहळ्ळी) असे त्याचे नाव आहे. अबकारी निरीक्षक प्रेमसिंग लमाणी, एम. आर. निलजकर, विनायक बोरण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी गुरुवारी ही कारवाई केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

हॉटेल व्यवसाय चालविणाऱया संतोषकडे गोवा बनावटीची 21 लिटर दारुसाठा, 24 लीटर बिअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अबकारी विभागाने कारवाई तीव्र केली असून बेकायदा दारुविक्री करणाऱयांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्मया आवळण्यात येत आहेत.

Related posts: