|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जात-उत्पनाचा दाखला आता झटपट

जात-उत्पनाचा दाखला आता झटपट 

प्रतिनिधी / बेळगाव

 शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना दहा ते पंधरा दिवस लागत होते. मात्र आता जात-उत्पनाचा दाखला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताच झटपट मिळणार आहेत. महसूल खात्याकडून प्रत्येक कुटुंबाचे ओटीपी (वन टाईम पासवर्ड) तयार करण्याचे काम चालू आहे. सदर काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण होताच सर्वसामान्य नागरिकांना नेम्मदी केंद्रावर अर्ज करताच क्षणार्धांत ऑनलाईन पद्धतीने जात-उत्पन दाखल्याची पूर्तता करणार आहे.

सध्या जात-उत्पनाचा दाखल्यासाठी नागरिकांना सर्व कागदपत्रे जमा करून त्यावर तलाठी, सर्कलची सही, शिक्का घ्यावा लागतो. त्यानंतर तो अर्ज नेम्मदी केंद्रामध्ये जमा करावा लागतो. त्यानंतर सकल सेवा अंतर्गत 21 दिवसाच्या कालावधीनंतर जात-उत्पनाचा दाखला सर्व सामान्य नागरिकांच्या हाती लागतो.   सहा महिन्यांपासून ओटीपीचे हाती घेण्यात आले आहे. सध्या 85 टक्के पूर्ण झाले असून 15 टक्के काम बाकी आहे. ओटीपीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना तातडीने कागदपत्रे देण्याची सोय करणार आहे.

नेम्मदी केंद्रांतून शासकीय कागदपत्राची पूर्तता

 नेम्मदी केंद्रांतून शासकीय कागदपत्राची पूर्तता केली जाते. त्यामुळे कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. मात्र आता जात-उत्पनाचा दाखल काही क्षणार्धांत दिला जाणार  असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर विद्यार्थी वर्गाचे हेलपाटे कमी होणार आहेत.

उत्पनाचा दाखला महत्त्वाचा

सरकारी नोकरीत आरक्षण, शैक्षणिक प्रवेश, शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जात उत्पनाचा दाखला महत्त्वाचा आहे. ओटीपीमुळे जात-उत्पनाचा दाखला मिळविणे आता सोपे होणार आहे. सध्या ओटीपीचे काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण होताच जात-उत्पन दाखला देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी नेम्मदी केंद्रात आधारकार्ड व रेशनकार्डची पूर्तता केल्यास संबंधितांना या शासकीय कागदपत्राची पूर्तता करण्यात येणार आहे.