|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेच्या महिलेने 6 जणांना दिला जन्म

अमेरिकेच्या महिलेने 6 जणांना दिला जन्म 

ह्यूस्टन

 अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात एका महिलेना 6 जणांना एकाचवेळी जन्म दिला आहे. महिलेने अमेरिकेच्या ‘द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास’मध्ये 6 गोंडस बाळांना जन्म दिला आहे. थेलमा चॅका या महिलेने शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 4 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास 5 मुलगे आणि दोन मुलींना जन्म दिला आहे.  प्रसूतीनंतर थेलमा यांची प्रकृती ठीक आहे.  थेलमा यांनी मुलींना जीना आणि जुरियल अशी नावे दिली आहेत. तर स्वतःच्या चारही मुलांचे नामकरण अद्याप केलेले नाही. 6 जणांना जन्म दिल्यावर थेलमा आणि त्यांच्या परिवाराला मोठा आनंद झाला आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱयांसाठी देखील नवा अनुभव होता. रुग्णालयाचे कर्मचारी तसेच रुग्णाचे नातेवाईक एकाचवेळी जन्माला आलेल्या 6 बाळांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  एकावेळी 6 जण जन्माला येण्याची घटना जगात अत्यंत कमी वेळा घडते. 4.7 अब्ज महिलांपैकी एक महिलाच एकाचवेळी 6 मुलांना जन्म देते.

Related posts: