|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता

भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

 दिल्लीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. आज भाजपच्या उमेदवारांची यादीची घोषणा करण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी,  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक 11 एप्रिल रोजी होणार असून या पहिल्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवार यादी कालच्या बैठकीत अंतिम करण्यात आली.  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 मतदार संघात निवडणूक पार पडणार आहे. आगामी लोकसभेसाठी काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. तर 40 नवीन चेहऱ्यांना रिंगणात उतरवणार आहे. ज्या विद्यमान खासदारांविरोधात मतदारसंघात नाराजी आहे अशांना पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून मिळाली आहे. तसेच काही खासदारांचे मतदार संघ बदलले जाण्याची शक्यता आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपा सूत्रांकडून मिळाली आहे. देशातील 28 राज्यांपैकी 12 राज्यांमध्ये भाजपाची आणि 6 राज्यांमध्ये भाजपा युतीची सत्ता आहे. यातील काही राज्यात भाजपविरोधी वातावरणाचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ज्या विद्यमान खासदारांविरोधात नाराजी आहे अशांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षनेतृत्त्वाने घेतला.

Related posts: