|Monday, June 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » प्रेमाचा कल्ला ‘बस बुलेटवर’

प्रेमाचा कल्ला ‘बस बुलेटवर’ 

‘खंडेराया झाली माझी दैना’, ‘सुरमई’, ‘आली फुलवली’ आणि आत्ता चेतन गरूड प्रोडक्शन ‘बस बुलेटवर’ हे रोमँटिक साँग घेऊन आले आहे. तरुणांच्या मनातले भाव बिनधास्तपणे गाण्याच्या स्वरुपात मांडल्यामुळे हे गाणं गल्लीनाका व्हाया कॉलेज कट्टय़ावर ऐकू येईल, असा विश्वास प्रोडक्शनला आहे. हे मस्तीभर गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे. या गाण्यात ‘स्त्राrलिंग पुल्लिंग’ या गाजलेल्या वेबसिरीजमधील भाग्यश्री आपल्या मस्तीभऱया अंदाजात थिरकताना दिसणार आहे.

या गाण्याची जादू तरुणाईला वेडावून सोडेल अशीच आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या प्रेमातला कल्ला सांगणारे हे गीत लिहिले आहे अक्षय कर्डक यांनी तर त्याला साजेसं तडकभडक संगीत लाभलंय अतुल भालचंद्र जोशीöसिद्धेश कुलकर्णी या द्वयींचं. गायक केवल जयवंत वाळंज यांनी आपल्या मस्तीभऱया गायकीने गाण्यात खासच रंग भरलेत. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणारे डॅक्स मॅथ्यू आणि भाग्यश्री यांनी गाण्यात एकच कल्ला उडवून दिलाय.