|Monday, June 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं’…

‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं’… 

‘वेडिंगचा शिनेमा’ मधील गाणं प्रदर्शित

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाचे तिसरे गाणे ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं… कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं…’ प्रदर्शित केलं आहे. हे गाणे सलील कुलकर्णी यांचे पुत्र शुभंकर यांनी गायले आहे.

पारंपरिक रितीरिवाज ते आधुनिक पॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळय़ांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. वेडिंगचा शिनेमामध्ये हे सगळे पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट 12 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

वेडिंगचा शिनेमामध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱहाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी चित्रपटातून पदार्पण करत आहे.