|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद 

ऑनलाईन टीम / काश्मीर  : 

जम्मू -काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये आज सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून भारतीय सैन्यानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्यात 1 जवान शहीद तर तीन जण जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर महिन्याभरात पाकिस्तानने शंभरहून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आज सकाळी साडेपाच वाजता राजौरी जिह्यातील केरी बट्टल आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये मोर्टलने हल्ला केला आहे. या हल्ल्याचे भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आणि अखेर काही तासांनंतर ही चकमक थांबली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जवानांवर जवळच्या रुग्णालयत उपचार सुरु असल्याचं समजतं. याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.